पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Pustkache atmavritta essay in marathi

पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Pustkache atmavritta essay in marathi
आत्मवृत्तात्मक/Autobiography



नमस्कार, मित्रांनो ! ओळखलत का मला?
अहो असे घाबरताय का तुम्ही? मी तुमचा जुना मित्र “पुस्तक”.काचेच्या कपाटात पडून पडून खूप कंटाळा आलाय मला. म्हणूनच मला आज तुमच्या सोबत थोड बोलायचे आहे. आज मला तुम्हाला काही सांगायचे आहे.चला तर मग करूया का सुरुवात.

मित्रांनो माझा जन्म एका कारखान्यात झाला तिथे माझ्याबरोबर माझे खूप सारे मित्र होते.तिकडे माझ्या पांढऱ्या शुभ्र कागदावर विविध मजकूर प्रसिद्ध करण्यात आला त्याचबरोबर वेगेवेगळी सुंदर अशी चित्र छापण्यात आले. मला या गोष्टीचा खूप अभिमान होता आणि मला माझे जीवन सार्थ झाले असे वाटत होते.त्या कारखान्यातून माझी रवानगी एका पुस्तकाच्या दुकानात करण्यात आली त्या दुकानात मी खूप दिवस पडून होतो कोणी मला घेऊन जात नव्हते आणि एके दिवशी तुमची नजर माझ्यावर पडली आणि तिकडून तुम्ही मला घेवून आलात. आज जरी मी कपाटात धूळ खात पडलेलो असेले पण कधी एके काळी मी तुमचा सर्वात जवळचा, लाडका मित्र होतो. मला तुम्ही “ज्ञानगंगा” म्हणायचात. माझ्यासोबत वेळ घालवायला, मला वाचायला तुम्हाला खूप आवडायचे; आणि मला सुद्धा तुमचा सहवास खूप आवडायचा. तेव्हा तुम्ही मला वाचण्यात एवढे गुंग व्हायचा की तुम्हाला मला वाचताना कशाचे भान नसायचे.मला वाचताना तुमच्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता यायची ती बघून मलाही खूप आनंद व्हायचा. तुम्ही एकटे असता तेव्हा मला घेऊन बसायचा;त्यावेळी तुमचा एकटेपणा दूर करून तुमचं मनोरंजन करताना मला खूप आनंद व्हायचा. पुस्तक वाचण्याची तुमच्याकडे खूप कारणे होती. काहीजण ज्ञान मिळवण्यासाठी मला वाचायचे. कोणी करमणूक म्हणून माझ्यासोबत वेळ घालवायचे.माझे दिवस तुमच्याबरोबर मस्त चाले होते. मला चांगले आठवते मी नवीन असताना तुम्हाला माझ्या पानाचा सुगंध आवडायचा. तुम्ही माझ्या पानांमध्ये झाडाचे पान फुलाच्या पाकळ्या किंवा मोरपंख ठेवायाचे.

जसजसे दिवस जाऊ लागेल तसतसे तुम्ही सर्वांनी माझे वाचन केले आणि नंतर सर्वांचे वाचन झाल्यावर तुम्ही मला स्वतःपासून हळुहळू दूर केले आणि आता तर तुम्ही माझ्याकडे बघत ही नाही.आज मला तुमच्या या वागण्याचे खूप दुःख होत आहे. कारण आज तुम्हाला माझ्यासोबत वेळ घालवायला आवडतच नाही. मी तुमच्यासोबत नसून कुठेतरी अडगळीच्या खोलीतील कपाटात पडून आहे कोणी माझ्याकडे बघत सुद्धा नाही.Sतुम्ही पुस्तकांना गुरू मानता म्हणून तर म्हणातात ना “ग्रंथ हेच गुरू”. मग जसा तुम्ही तुमच्या गुरूंचा मान ठेवता, त्यांचा आदर करता, त्यांची काळजी घेता तशी आमची का नाही घेत. आम्हला पण भावना आहेत.

तुमच्या आणि माझ्या नात्याची एक घट वीण होती पण आधुनिक काळात तुम्ही तंत्रज्ञानाशी नात जोडल आणि मला विसरलात. पुर्वी मला “ज्ञानाचे भंडार” म्हणायचात पण आता काल परवा आलेला मोबाईल तुम्हाला जास्त जवळचा वाटत आहे आणि त्यात तुम्ही ज्ञानाचा शोध घेत आहात. मी आजही तुमच्याकडे बघत असतो मला वाटत, की तुम्ही मला उचलावं, वाचाव माझ्या पानांचा सुगंध घ्यावा. पूर्वीसारखा माझ्यासोबत वेळ घालवावा. मला वाचताना तुमच्या चेहऱ्यावरील ते हास्य,ती प्रसन्नता मला परत बघायची आहे एवढीच माझी इच्छा आहे.

मित्रांनो माझी विनंती आहे तुम्हाला की मला तुमच्यापासून दूर सारू नका. पुस्तके जीवनाचा आधार असतात हे तुम्ही विसरू नका. तुम्हाला चांगले घडवण्यात माझा पण हात आहे हे विसरू नका. कधीतरी माझ्यासोबत वेळ घालवा,गप्पा मारा, तुमच मन मोकळ करा. जस मी तुम्हाला माझा मित्र मानतो तसच तुम्ही मला तुमचा मित्र माना.तुम्ही मला तुमच्या जिवलग मित्रासारखे जपा. मोबाईल, तंत्रज्ञान या सर्व गोष्टींमधून थोडा वेळ काढून मला जवळ करा .तुमचा एकटेपणा दूर करण्याची मला संधी दया.मला तुमचा एक जिवलग मित्र बनून राहू दया.मला आशा आहे की कधीतरी तुम्हाला माझी किंमत कळेल. तुम्ही मला कपाटातून काढून माझ्या जागी मला ठेवाल, तुमच्या जवळ ठेवाल.

एवढे बोलून पुस्तक शांत झाले. मी निश्चय केला आजपासून पुस्तकाची नीट काळजी घेणार, पुस्तकावर काही लिहणार नाही, पुस्तकाची पाने दुमडणार नाही, पुस्तकाची पाने फाडणार नाही. पुस्तकांना नेहमी जपून वापरेल आणि इतरांना ही असेच करायला सांगेन.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started